लक्ष्मीपूजन
सामान्यत: अमावस्या हा दिवस अशुभ मानला जातो. पण याला आश्विन अमावस्येचा अपवाद आहे. अश्विन कृष्ण अमावस्या हा दिवस लक्ष्मीपूजनाच पवित्र दिवस म्हणजेच दिवाळीचा मुख्य दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण ह्याच दिवशी लक्ष्मीने श्री विष्णूसह इतर देवतांना बळीच्या कारागृहातून सोडवले. त्यानंतर हे सर्व देवगण क्षीरसागरात जाऊन झोपले अशी कथा सांगण्यात येते. ह्या प्रसंगाचे अवचीत्य साधून प्रत्येक घरात सर्वत्र दिवे लावून लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे.या दिवसाची आख्यायिका आहे. या दिवशी बळीराजा पाताळात गाडला गेला आणि त्याच्या तावडीतून सर्व देवतांची सुटका झाली. शिवाय लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित राहिले. याची आठवण म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते. हा दिवस व्यापारी लोक विशेष उत्साहाने साजरा करतात. त्यांच्या पूजेचा दिमाख पाहण्याजोगा असतो. सायंकाळी नवीन वस्त्रावर रांगोळी रेखून तबक ठेवले जाते. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, आपल्याकडील मिळकतीची कागदपत्रे, खतावण्या, वह्या आदी ठेवले जाते. या सर्वांची ङ्गुले, ङ्गळे, हळद-कुंकू, नैवेद्य, अक्षता आदींद्वारे विधीवत पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी पक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. साळीच्या लाह्या, बत्तासे, अनारसे, डाळींबाचे दाणे, पंचामृत अशा पारंपरिक पदार्थांनी देवीला तुष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवशी लक्ष्मीबरोबरच घरातील केरसुणीलाही पूजेचा मान असतो. घर स्वच्छ करणारी केरसुणी उत्सवमूर्ती असते. तिची देखील पाणी, हळदकुंकु, फले, हार आदींनी पूजा केली जाते आणि नंतरच तिचा वापर करणे सुरू होते. लक्ष्मीबरोबरच कुबेराचेही पूजन केले जाते. संध्याकाळी फटाक्यांच्या दणदणाटात लक्ष्मीचे स्वागत होते.
याच दिवशी संध्याकाळी आणखी एक पूजाविधी संपन्न होते तो म्हणजे यमराज पूजन आणि यमदीपदान. यासाठी घररातील स्त्री एका पात्रामध्ये तिळाच्या तेलाचे दिवे लावते. या दिव्यांची गंध, पुष्प, अक्षता यांनी पूजा केली जाते. दक्षिणेकडे तोंड करून यमाची प्रार्थना केली जाते. त्यानंतर हे सर्व दिवे सार्वजनिक ठिकाणी ठेवले जातात. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावरती अखंड तेवत ठेवला जातो. अशा प्रकारे विधी केल्यास यमाच्या पाशातून आणि नरकातून मुक्ती मिळते असा समज आहे. याखेरीज यमासाठी पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरही लावला जातो. या दिव्याची देखील तांदूळ, गूळ, पाणी, ङ्गुले, नैवेद्यासह पूजा केली जाते. अशा प्रकारे यमराज पूजन संपन्न होते. अकाली मृत्यूदोष आणि पिडा टाळणे हा या विधीच्या आयोजनामागचा उद्देश आहे. या दिवशीचा मुख्य नैवेद्य धने आणि गुळाचा असतो. काही ठिकाणी कडूलिंबाची पाने आणि गूळ देखील नैवेद्य म्हणून देवापुढे ठेवतात.
लक्ष्मीपूजन करतांना घर स्वच्छ करून दिवे- पणत्या लावून घर सुशोभित करावे नंतर देव्हा-यासमोर चौरंगावर अक्षतांचे अष्टदल करून लक्ष्मीच्या मूर्तीची व कुबेराची स्थापना करावी. धणे , गुळ व साळीच्या लाह्या नैवद्याला ठेवाव्यात. ह्या अमावस्येला लक्ष्मी व कुबेराची पूजा करावी असे सांगण्यात येते, कारण लक्ष्मी म्हणजे धन – दौलत हि धनदौलत म्हणजेच संपत्ती किती जरी असली तरी ती टिकवता येणे महत्वाचे असते. हीच आपली संपत्ती टिकवून राहण्यासाठी कुबेर ह्या देवतेची पूजा करावी. कारण कुबेर ही देवता धनाधीश आहे, संपत्ती कशाप्रकारे वाचवून ठेवायची हे ही कुबेर देवता शिकवते. विशेषत: व्यापारी वर्ग लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात साजरी करतात. धनासाठी म्हणजेच संपत्तीसाठी धणे तर सुखसमृद्धीचे प्रतिक म्हणून साळीच्या लाह्या असा नैवद्य दाखवला जातो. ज्याप्रमाणे घरात लक्ष्मी नांदावी या करीता लक्ष्मीची पूजा करतात त्याचप्रमाणे घरातील अलक्ष्मीचा नाश होण्यासाठी केरसुणीची पूजा करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी नव्या केरसुणीने घरातील कचरा बाहेर काढतात, म्हणजेच घरातील अलक्ष्मीला बाहेर काढले जाते. ह्या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते, व ज्या घरात स्वच्छता, आनंद नांदत आहे, तसेच जेथे देवभक्त, क्षमाशील व कर्तव्यदक्ष पुरुष व गुणवान तसेच पतिव्रता महिला आहेत अशाच घरात लक्ष्मी राहण्याचे पसंद करते. अशाठीकाणी लक्ष्मीचा वावर जास्तप्रमाणात असतो. त्यामुळे ह्या दिवशी घराबाहेर आकाशकंदील व पणत्या लावून घर शुशोभित करण्यात येते. सायंकाळी घरातील सर्व मंडळीबरोबर लक्ष्मीपूजन झाल्यावर आतिषबाजीने घरात येणा-या लक्ष्मीचे स्वागत करण्यात येते.